पुण्याच्या विभाजनाची मागणी का केली? भाजपा आमदार महेश लांडगेंनी सांगितले कारण...
Admin

पुण्याच्या विभाजनाची मागणी का केली? भाजपा आमदार महेश लांडगेंनी सांगितले कारण...

आकुर्डीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ग. दि. मा. नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं.
Published by :
Siddhi Naringrekar

आकुर्डीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ग. दि. मा. नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महेश लांडगेंनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. पुणे जिल्ह्याचं विभाजन केलं जावं आणि शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.

आमदार महेश लांडगे एका माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ८० लाखांच्या पुढे गेली आहे. जुन्नरच्या कोपऱ्यातल्या आदिवासी बांधवाला अचानक शासकीय यंत्रणेची गरज असेल, तर ती लगेच पुरवता आली पाहिजे एवढाच माझा उद्देश आहे. ही मागणी माझी वैयक्तिक आहे.

छोट्यामोठ्या गोष्टी लोकांपर्यंत लवकर पोहोचायला मदत होईल. विद्यार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र लवकर हवे असतात. योजना राबवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. जुन्नरच्या कोपऱ्यापर्यंतच्या लोकांना पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात यावं लागतं. एवढाच माझा उद्देश आहे. असे महेश लांडगे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com