Chennai Thermal Power Plant
Chennai Thermal Power Plant

Chennai Thermal Power Plant : चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात कमानी कोसळून 9 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात कमानी कोसळली

  • 9 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

  • स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू

(chennai thermal power plant )चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात कमानी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातामुळे भितीचे वातावरण पसरले असून 30 फूट उंचीवरून ही कमानी कामगारांवर कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी उत्तर चेन्नईतील स्टॅनली सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com