ताज्या बातम्या
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; मुंबईच्या परळ भागात उभारणार नवं टर्मिनस
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत परळ इथं नवं टर्मिनस उभारण्यात येणार आहे. सीएसएटीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतला आहे. दादर ते सीएसएमटी दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला तर या अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागतात. यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
तसेच सध्या या जागेत रेल्वेचं मोठं वर्कशॉप आहे. तेथील काही युनित माटुंगा कारशेडमध्ये हलवण्यात येणार आहेत.