Makar Sankranti 2025 : मकरसंक्रांती सण का साजरा करतात? तीन दिवसांच्या उत्सवाची परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या
नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा मकरसंक्रांत हा सण शेती, निसर्ग आणि परंपरेशी जोडलेला आहे. या काळात शेतात आलेल्या नव्या धान्याचा आनंद महिलांमध्ये वाटला जातो. एकमेकींना धान्य देण्याची ही पद्धत सुगड म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत.
संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे महिला आवर्जून काळी साडी परिधान करतात. हळदीकुंकवाचे कार्यक्रमही मोठ्या उत्साहात होतात आणि रथसप्तमीला त्याचा समारोप होतो.
पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने राक्षसांचा नाश करून लोकांना दिलासा दिला, म्हणून हा दिवस उत्सव म्हणून पाळला जातो. भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. याच काळापासून दिवस हळूहळू मोठे आणि रात्र लहान होत जाते. यालाच उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. मकर संक्रांत हा हिंदू परंपरेतील असा सण आहे ज्याची तारीख दरवर्षी बदलत नाही. ऋतू बदलाची चाहूल देणारा हा सण देशभर वेगवेगळ्या पद्धतींनी, पण तितक्याच आनंदाने साजरा केला जातो.
थोडक्यात
• नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा होणारा मकरसंक्रांत सण
• शेती, निसर्ग आणि परंपरेशी घट्ट नातं
• शेतात आलेल्या नव्या धान्याचा आनंद साजरा केला जातो
• महिलांमध्ये धान्य वाटण्याची परंपरा
• एकमेकींना धान्य देण्याची पद्धत ‘सुगड’ म्हणून ओळखली जाते
• महाराष्ट्रात मकरसंक्रांत तीन दिवस साजरी होते
• भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवसांचे स्वरूप

