महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मालाड पोलिसांकडून अटक

महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मालाड पोलिसांकडून अटक

आत्तापर्यंत आरोपीने 25 होऊन अधिक महिलांना असे व्हिडिओ पाठवले अशी माहिती समोर आली आहे.

रिध्देश हातिम|मुंबई: फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुप वरून महिलांचे डीपी बघून त्यांचा नंबर काढून त्यांना अश्लील व्हिडिओ पाठवून, अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या आरोपीला मुंबईतील मालाड पोलिसांनी पुण्यातून अटक केले आहे. अटक आरोपीच्या मोबाईल तपासल्यानंतर आत्तापर्यंत आरोपीने 25 होऊन अधिक महिलांना असे व्हिडिओ पाठवले अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 35 वर्षीय महिलेने गुन्हा दाखल केला होता की एक अनोळखी इसम अश्लील व्हिडिओ पाठवणे आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून महिलेला त्रास देत होता. गुन्ह्याचे गांभीर्य घेत मालाड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने आरोपीला पुणे येथून अटक केले. अटक आरोपीचे नाव नाव ज्योतीराम बाबुराव मंसुले(27) असून डिलिव्हरी बॉयच काम करतो आणि पुण्यात आपल्या भावासोबत राहतो. सध्या मालाड पोलिसांनी आवाहन केले आहे की, ज्या ज्या महिलांना असे अश्लील व्हिडिओ पाठवणे या अश्लील व्हिडिओ कॉल आले असतील तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल करावे ज्याची पोलीस तपासणी करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com