आंतरराज्य टोळीचा मालाड पोलिस ठाणे कडून पडदाफाश
रिद्धेश हातिम|मुंबई : मालाड पोलीस ठाणे हद्दीत लिबर्टी गार्डन येथील एका इमारतीमध्ये दिवसाढवळया एका बंद घराचे कुलूप तोडुन घरातील एकुण रुपये १,८७,५००/- ची मालमत्ता अज्ञात इसमांनी चोरी झाल्याचे तक्रार नोंद करण्यात आली. आरोपीतांनी कोणताही पुरावा न ठेवल्याने व गुन्हयाच्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने आरोपीविषयी काहीएक माहिती मिळुन येत नव्हती. ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर संशयित आरोपी कुर्ला परिसरात एका लॉजवर थांबले असल्याचे समजले. तेथे जाऊन चौकशी केल्यावर ते तेथुन निघुन मुंबई सेंट्रल टर्मनस येथे गेल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल टर्मीनस येथे जाऊन प्लॅटफॉर्मवर त्यांचा शोध घेतला असता ते मिळुन न आल्याने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर आरोपी राजधानी एक्सप्रेस गाडीमध्ये बसल्याचे दिसुन आले.
मालाड पोलीसांनी राजधानी एक्सप्रेस गाडीवरील असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी सतत संपर्क साधुन व त्यांना आरोपींचे उपलब्ध छायाचित्र व त्यांचे विषयी प्राप्त केलेली माहिती पुरवून एकुण तीन आरोपींना रतलाम, मध्यप्रदेश येथे रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या मदतीने ताब्यात घेतले. 1) निजाम निसार शेख (46),