डाळ महाग शिजवणार काय? खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

डाळ महाग शिजवणार काय? खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत.
Published on

मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीला देशभरातील २८ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले की, आजची बैठक योग्य पद्धतीने झाली. सगळ्यांचा उद्देश एकच आहे. महागाई कशी कमी करता येईल. रोजगार निर्मिती कशी करता येईल. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्या कमी झाल्या पाहिजे. मोदीची नेहमी १०० रुपये वाढवतात आणि दोन रुपये कमी करतात, असे त्यांचे धोरण आहे. गरिबांच्या विरोधात मोदी काम करतात. उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, असा आरोपही खर्गे यांनी केला.

डाळ महाग शिजवणार काय? खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत ठरले 'हे' 3 मोठे ठराव

दरम्यान, या बैठकीत या बैठकीत तीन मोठे ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शरद पवार, संजय राऊत, केसी वेणूगोपाल, एम के स्टॅलिन, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चड्डा, मेहबूबा मुफ्ती, डी राजा, ओमर अब्दुला यांच्या समावेश, जावेद खान, ललन सिंग, हेमंत सोरेन यांचा या समितीत समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com