Malegaon Crime : मालेगावातील तीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज मानेगाव बंदची हाक
( Malegaon Crime ) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली. तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. खेळण्यासाठी बाहेर गेलेली चिमुकली खूपवेळ घरी आलीच नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला, काही तासांनंतर घराच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर रात्री उशिरा गावकऱ्यांना मोबाईल टॉवरशेजारी तिचा मृतदेह आढळला. चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी तत्काळ तपास सुरू करून विजय संजय खैरनार (२४) या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून लोकांचा वाढता रोष पाहता न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्थ तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज मानेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध होणार व्यक्त केले आहे.
थोडक्यात
मालेगावातील तीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज मानेगाव बंदची हाक
आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध होणार व्यक्त
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

