Kuja - Ketu Yog 2025 : मंगळ-केतूच्या युतीने तयार होतोय 'कुजकेतू योग'! मेषसह 'या' 5 राशींसाठी पुढील 51 दिवस कठीण; जाणून घ्या उपाय
येत्या 7 जून 2025 रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह ही सूर्यदेवांची राशी असून ती स्वतःच उर्जेचे प्रतीक आहे. मंगळदेखील अग्नी तत्वाचा ग्रह असल्याने, या गोचरामुळे उग्रता आणि आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात सिंह राशीत केतू आधीच विद्यमान आहे. त्यामुळे मंगळ आणि केतू यांचा संयोग 'कुजकेतू योग' तयार करेल, जो ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानला जातो.
ही युती मेष, वृषभ, सिंह, कन्या आणि मीन या राशींवर अधिक परिणाम करेल. पुढील ५१ दिवस या राशींसाठी संयम, विवेक आणि सहनशीलतेची कसोटी असणार आहे. या काळात कुठल्याही भावनिक प्रतिक्रियेला आवर घालणं आवश्यक ठरेल.
मेष राशी
या राशीसाठी मंगळ सिंह राशीत नवम स्थानात राहील, जे भाग्य स्थान असते. त्यामुळे धार्मिक प्रवृत्तीत वाढ होईल, पण कामकाजात अडथळे येण्याची शक्यता आहे. क्रोध आणि तणाव टाळावा.
उपाय : रोज लिंबाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा.
वृषभ राशी
धनविषयक अडचणी, नातेसंबंधांतील कटुता, कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. जमीन-जुमल्याचे प्रश्न उद्भवू शकतात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
उपाय : दररोज वडाच्या झाडाच्या मुळाशी गोड दूध अर्पण करा.
सिंह राशी
या राशीतच मंगळ आणि केतू युती करणार असल्याने, या काळात आक्रमक वर्तन, अपघात, रक्तदोष यासारख्या त्रासांची शक्यता वाढेल. गरोदर स्त्रियांनी काळजी घ्यावी.
उपाय : कोणतीही वस्तू मोफत घेणे टाळा. गिफ्टही नको.
कन्या राशी
अनपेक्षित प्रवास, करिअरमधील विलंब आणि कौटुंबिक तणाव या राशीच्या लोकांना भेडसावू शकतो. निर्णय घेताना विशेष विचार करा.
उपाय : हनुमान मंदिरात बुंदीचे लाडू अर्पण करा आणि वाटा.
मीन राशी
स्वभावात चिडचिड वाढू शकते. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः ताप आणि त्वचारोग.
उपाय : गरजू लोकांना अन्न दान करा आणि नमकीन पदार्थ वाटा.
7 जून ते 28 जुलै 2025 या कालावधीत सिंह राशीत मंगळ आणि केतू यांची युती उग्र कुजकेतू योग निर्माण करणार आहे. याचा परिणाम विशेषतः पाच राशींवर अधिक जाणवेल. या काळात संयम, आत्मनियंत्रण आणि सूज्ञ व्यवहार आवश्यक ठरेल. योग्य उपाय केल्यास त्रास कमी करता येऊ शकतो.