Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान कोकाटे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण दुसरीकडे, सकाळपासून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळातूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदारकीही माणिकराव कोकाटे यांची रद्द करण्यात आली आहे. ()
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा देण्यात आला आहे. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल. असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नाही.
माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. पण आमदारकी रद्द करण्यासाठी विधीमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निकालाची प्रत मिळाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असल्याची माहिती विधीमंडळातील सुत्रांकडून मिळाली आहे
