Chennai : भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यवधींची हेराफेर; चार कोटींसह कार्यकर्ते रंगेहाथ सापडले

Chennai : भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यवधींची हेराफेर; चार कोटींसह कार्यकर्ते रंगेहाथ सापडले

चेन्नईत भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यवधी रुपयांची हेराफेर केली जात होती. चार कोटींच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहाथ पकडले गेले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

चेन्नईत भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यवधी रुपयांची हेराफेर केली जात होती. चार कोटींच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहाथ पकडले गेले आहेत. नेल्लई एक्प्रेसमध्ये रक्कम घेऊन निघालेल्या या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचं असताना सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तेच कोट्यवधी रुपयांची अफरातफर करीत असल्याचे समोर आलं आहे.

चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांना तब्बल चार कोटींच्या रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री उशिरा नेल्लई एक्प्रेसमधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन निघालेल्या तिघांना पकडण्यात आले. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशा वेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडेही निवडणूक आयोगाचे कडक लक्ष आहे. अशात ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हे लोकं चार कोटी रुपये सहा पोत्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते आणि हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरायचा होता. चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जप्त केलेली रोकड पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश, त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com