देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन! वयाच्या  92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन! वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, रॉबर्ट वाड्रांनी फेसबुकवर माहिती दिली
Published by :
shweta walge
Published on

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रॉबर्ट वाड्राने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गुरुवारी त्याची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झालं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता.

मनमोहन सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले . काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसची बेळगावातील सभा रद्द करण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द

डॉ. मनमोहनसिंग भारताचे 13 वे पंतप्रधान.

22 मे 2004 ते 26 मे 2014 या असे दहा वर्षे पंतप्रधान होते.

1991 ते 1996 दरम्यान पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते.

1982 ते 1985 दरम्यान रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते.

26 सप्टेंबर 1932 रोजी भारताच्या तत्कालीन पंजाब प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्थानातील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता.

अर्थतज्ञ असलेल्या डॉ. सिंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण पंजाब विद्यापीठातून झाले होते तर केंब्रीज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले होते.

डॉ. सिंग यांनी काही काळ पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले होते.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 'आंतरराष्ट्रीय व्यापार' हा विषय शिकवण्याचे काम केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com