'…तर पाणी सुटलं म्हणून समजा' सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
आज मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर सुरु असलेली बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या प्रतिनिधींना येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
ते म्हणाले की, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले 307 सारखे गुन्हे मागे घेण्यात यावे. सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन यावं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ. दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. असं काल सांगितलं होतं. आता एक दिवस शिल्लक आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. राज्य सरकारचं शिष्टमंडळ येईल, अशी अपेक्षा असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही पहिले पाढे पुन्हा पुन्हा सांगू नका. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.