Manoj Jarange | आचारसंहिता लावुन मराठ्यांचं वाटोळं केलं- मनोज जरांगे संतापले
विधानसभा निवडणुकांच्या तारिखा जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जरांगे यांनी महायुती सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यामागणीसाठी मनोज जरांगे ठाम होते. तसेच विधानसभा निवडणुकीआधी मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास सरकार पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला होता. मराठ्यांची दखल न घेता त्यांना बेदखल करण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठ्यांची दखल न घेता त्यांना बेदखल करण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या मुलांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम केलं. ज्या मराठ्यांनी सत्तेवर बसवलं त्या मराठ्यांना बेचिराख करण्यासाठी सत्तेचा वापर फडणवीसांनी केला. सरकारने आमची आशा संपवली. मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही, मराठ्यांची मुले आरक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत याअर्थाने काम फडणवीस यांनी केले. मराठ्यांना डिवचण्यासाठी मराठ्यांच्या शेपटावर पाय दिला. ओबीसींच्या १७ जाती आरक्षणामध्ये घातल्या मात्र मराठ्यांना आरक्षण दिले नाही.