जालन्यामध्ये सध्या प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. जालन्यामध्ये वाळू माफिया व गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाळू प्रकरण तसेच इतर काही प्रकरणातील नऊ आरोपींना त्यांच्या गावातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये जालना, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये एक धक्कादायक नाव समीर आले आहे.
मराठा आरक्षणामुळे प्रकाशझोतात आलेले मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या सहा आरोपींवर हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. सदर हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ तसेच सरकारी कामांमध्ये अडथळा असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
हे गुन्हेगार होणार तडीपार :
विलास हरिभाऊ खेडकर
केशव माधव वायभट
संयोग मधुकर सोळूंके
गजानन गणपत सोळूंके
अमोल केशव पंडित
गोरख बबनराव कुरणकर
संदीप सुखदेव लोहकरे
रामदास मसूरराव तौर
वामन मसूरराव तौर