मनोज जरांगे उपोषणावर ठाम! मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आठव्या दिवशी पण सुरुच आहे. त्यांनी उपोषण सोडावे यासाठी सरकारचे शिष्टमंडळ उपोषण स्थळी पोहचले आहे. मंत्री गिरीश महाजन, संदीपान भूमरे, अतुल सावे, अर्जुनराव खोतकर, राजेश टोपे हे जरांगे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जरांगे पाटील त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. मी सरकारला यापूर्वी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मग आता पुन्हा वेळ कशाला मागता, असा सवाल जरांगे यांनी केला.
सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या मनधरनीचे प्रयत्न केले. आंदोलन एवढं ताणून चालत नाही, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहेय एक महिन्याचा वेळ द्यावा, असे गिरिश महाजन म्हणाले.
यावर एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी गिरिश महाजन यांना केला. आधीही वेळ दिला आता गरज नसताना वेळ मागत आहात, असे जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही म्हणाल ते करतो आधी अध्यादेश काढा. आम्ही ओबीसीमध्ये आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहली. ४ फेब्रुरवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. अजून ४ दिवस सरकारला देतो."