ताज्या बातम्या
Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज, पोलिसांकडून परवानगी मिळणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टला आंदोलन सुरु केलं. त्यानंतर ते 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात पोहचल्यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांसोबत उपोषण सुरू केला आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे.
मनोज जरांगे पाटलांकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस उद्याची परवानगी देण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर एक दिवस आंदोलन करण्याला उद्या पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम असणार आहेत.