ताज्या बातम्या
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषण स्थळीच लावले सलाईन
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण नवव्या दिवशी पण सुरुच आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण नवव्या दिवशी पण सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषण स्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही असा निर्धार त्यांनी केला आहे.
उपोषणस्थळी आज सकाळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली. राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटलं. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत.