BJP Banner On Maratha Andolan : जरांगेंना भाजपचं बॅनरमधून जबाब; फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
Devendra Fandvis VS Manoj Jarage : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुन्हा हाक दिली आहे. जरांगेची तोफ पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहे. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. गणपती सणासुदीच्या काळात मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. काल म्हणजे 27 ऑगस्टला जरांगे त्यांच्या कुटुंबायांना भेटून मुंबईकडे निघाले आहेत. त्यासाठी मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह नवी मुंबईच्या दिशेने मुंबई आझाद मैदान येथे रवाना होणार आहेत. पोलिसांनी काही अटी घालून त्यांनी फक्त एक दिवसीय आंदोलनाची परवानगी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे जरांगे पाटील हे बेमुदत आंदोलन करणाऱ्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटीलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपची जोरदार बॅनरबाजी केली आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे व नरेंद्र पाटील यांची बॅनरबाजी केली आहे. "इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो" जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर दिले आहे.