Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण
थोडक्यात
मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार
जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असणार
मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असणार असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, उपोषण आहे. मराठे निघाले. त्यांना राजकारणाचे काही देणघेण नाही. त्यांच्यापुढे लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. सरकारला, मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्यावे वाटत आहेत की नाही हे आता उघड होणार आहे.