Manoj Jarange Patil : "आशेला लावणार सरकार, 75 वर्षापासून..." जरांगेंचं सरकारवर जोरदार टीकास्त्र

Manoj Jarange Patil : "आशेला लावणार सरकार, 75 वर्षापासून..." जरांगेंचं सरकारवर जोरदार टीकास्त्र

मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधून माध्यमांशी संवाद साधला, यावेळी मनोज जरांगेंनी सरकारवर टीका केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधून माध्यमांशी संवाद साधला, यावेळी मनोज जरांगेंनी सरकारवर टीका केली आहे. 'शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न, सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही' असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भुजबळांवर ठूसका फटाका, तो वाजत नाही.. असं म्हणत निशाणा साधला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने दिलेला नुकसान भरपाई जाणीधी आलाच नाही, वरती संकट.. त्यांना हातभार लावणे सरकारची जबाबदारी.. तात्पुरता आनंद देणारे हे सरकार आहे. आशेला लावायचे 75 वर्षापासून हेच होतेय. दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्यानंतर शेतकरी तज्ञांना अंतरवाली मध्ये बोलवून, त्यांच्याशी चर्चा करून त्यानंतर राज्याची बैठक घेऊन पुढील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फडावेच लागतील आपल्याला न्याय मिळणार नाही.. तुझ्याशी 70 वर्षे गेले तसे आपले अनेक पिढ्या जातील. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा".

जीआरवर बोलताना जरांगे म्हणाले की, "ओबीसी नेत्यांची राजकारणासाठी धडपड चालू आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वासाठी चालल आहे ओबीसीचं त्यांना देणे घेणे नाही. तो जीआर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचं त्याला हात लावायला टप्पर नाही. त्या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जातो, मी राहत नाही. बावनकुळे यांचे म्हणणं आहे पाच जिल्ह्यांसाठी मराठवाड्यात पूर्वी पाचच जिल्हे होते ते आता आठ झाले. मराठ्यांनी दमा दमाने जावे ही माझी अपेक्षा आहे".

तसेच पुढे ते म्हणाले की, "फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसला आहे तो त्यांनी ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा.. जीआर ओके आहे, थोडाफार बिघडला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे.. तात्पुरता आनंद आपल्या जवळ जमत नाही तुम्ही जीआर काढला त्याचा आम्ही कौतुक केलं मात्र आता प्रमाणपत्र विचारित होणे गरजेचे आहे.. एकीकडे जीआर मुळे ओबीसींना धक्का लागत नाही म्हणायचं त्यांना खुश करायचं आणि इकडे मराठा समाजाला सांगायचं तुम्हाला जीआर दिला म्हणजे ते खुश.. हे मतदाना पुरतं हे माझ्याजवळ चालत नसतं. आनंद आपल्याजवळ जमत नाही.. प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे.."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com