ताज्या बातम्या
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरू
मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्यांदा उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून, आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे.
मध्यरात्री 12 वाजल्या पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे.