मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली धाराशिव जिल्ह्यात; स्वागताची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली धाराशिव जिल्ह्यात; स्वागताची जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव मध्ये मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव मध्ये मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मराठा बांधवाकडून रॅलीची जय्यत तयारी पुर्ण झाली असून नियोजनासाठी 1200 स्वयंसेवकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. रॅलीत 3-4 लाख मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांना मार्गदर्शन करणार असून आरोग्य पथके तैनात करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com