Manoj Jarange Patil Press Conference
Manoj Jarange Patil Lokshahi

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले; "छगन भुजबळ या सर्व गोष्टी..."

"मराठा समाज स्वत:ची कामं सोडून या आंदोलनात सहभागी होत आहे. मुलांना न्याय मिळावा म्हणून हा आक्रोश आहे, हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मराठा समाज स्वत:ची कामं सोडून या आंदोलनात सहभागी होत आहे. मुलांना न्याय मिळावा म्हणून हा आक्रोश आहे, हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. सरकार या गोष्टी समजून घेईल, अशी मराठा आंदोलकांना आशा आहे. न्यायासाठी मराठी माणूस आता घरात बसायला तयार नाहीत. लक्ष्मण हाके म्हणाले, तुम्ही विधानसभेत कितीही उमेदवार पाडा, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांना आम्ही विरोधक मानलं नाही. कधी मानणार नाही. ज्या माणसाला आपण विरोधक आणि शत्रू मानत नाहीत. त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. छगन भुजबळ या सर्व गोष्टी घडवून आणत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे.

मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनात भूमिका बदलतात, असं विरोधक म्हणतात, यावर जरांगे म्हणाले, पहिल्या दिवसाची आणि आजच्या दिवसाची मागणी काय आहे? हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. तुमच्या अनेक रॅली पाहिल्या, मागच्या रॅलीत मराठे दिसले नाहीत, त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता, यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, छगन भुजबळ जे करत आहेत, ते सामन्य ओबीसी बांधवांना, दलित, मुस्लिमांना चांगलं वाटत नाही. जातीवाद पसरवणं, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यानंतरही त्या रद्द करा, असं सांगतात. जर सरकारी नोंदी सापडल्या असतील, तर आपले नेते फुकटचं भांडण का करत आहेत? नोंदी सापडल्या नसत्या, तर मराठ्यांचं गॅझेट नसतं. सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचं काम करायला लागले आहेत. हे त्यांच्या लक्षात आलं आहे. म्हणून सर्व जातीधर्माचे लोक रॅलीत सहभागी व्हायला लागले आहेत.

तुम्ही सतत सांगता धनगर, ओबीसी समाजाचा माझ्या विरोधात नाही, तरीही तुमच्यावर टीका का होतात? या प्रश्नाचं उत्तर देताना जरांगे म्हणाले, ज्यावेळी आपण कुणाला विरोधक किंवा शत्रू मानत नाही. पण आम्ही गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाला कधीही दुखवलं नाही. आता जर आरक्षण नाही मिळालं? तर विधानसभेची तयारी कशी राहिल? यावर जरांगे म्हणाले, १३ तारखेपर्यंत शंभुराजे साहेबांवर विश्वास ठेवला आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण शंभर टक्के मिळेल. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी, ही पहिल्या दिवसापासून मागणी आहे. ही मागणी बदललेली नाही. कुणबी आणि मराठा एकच आहेत.

ओबीसींच्या यादीवर ८३ क्रमांकावर कुणबी आहेत. त्यात १८० जाती घातल्या. आता त्या ४०० झाल्या आहेत. म्हणजे बाकीच्या जाती, पोटजाती, उपजाती म्हणून घातल्या आहेत. त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे. मग कुणबी, मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाहीत का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आणि आमचा व्यवसाय तर एकच आहे. जे तुमचे निकष आहेत, ते आम्हाला का लागू होत नाहीत? आमची मागणी बदललेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com