मनोज जरांगेंची मराठा सेवकांची निवड, 6 जूनला होणार मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणामुळे चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणासाठी ते आता नवीन रणनीती आखणार असल्याचे म्हंटले जात आहे. नुकतीच जरांगे यांनी राज्यभरात मराठा सेवक नेमले जाणार असल्याचे सांगितले आहे. जरांगे यांनी मराठा सेवकांची पहिल्या टप्प्यातील बैठक घेतली. समाजच्या समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवर मराठा सेवकाची निवड करण्यात येणार आहे असे जरांगे यांनी सांगितले. राज्यभरातल्या सेवकांची निवड झाल्यानंतर याची 6 जूनला जरांगे घोषणा करणार आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
6 जूनच्या आत राज्यातल्या गावागावत मराठा सेवक देणार आहे. मराठा सेवक कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा नसणार आहे. मराठ्यांचा सेवक म्हणून हक्काचा माणूस देणार आहे. समाजाच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी मराठा सेवक दिले आहे, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.
मराठ्यांचा सगळ्यांनी वापर करून घेतला फक्त भांडणासाठी उपयोग करून घेतला. पुढच्या काळातही मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले.