Dharmendra Death : धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकार स्मशानभूमीत दाखल…
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मोठी कारकिर्द अभिनेत्याची राहिली आहे. धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान अभिनेत्याने शेवटचा श्वास घेतला. यादरम्यान अनेक बॉलिवूड कलाकार धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाताना दिसले. विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून धर्मेंद्र यांचे कुटुंबिय स्मशानभूमीत पोहोचले आहेत. यादरम्यान बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे देखील स्मशानभूमीत पोहोचले आहेत.
हेमा मालिनी देखील विलेपार्लेतील स्मशानभूमीत पोहोचल्या आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार स्मशानभूमीकडे धाव घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली. अमिर खान देखील स्मशानभूमीकडे रवाना झाला. करण जोहर यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका युगाचा अंत झाल्याचे करण जोहरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
धर्मेंद्र यांना रूग्णालयातून घरी आणल्यानंतर अमिताभ बच्चन स्वत: गाडी चालवत धर्मेंद्र यांचे घर गाठले. धर्मेंद्र यांची भेट अमिताभ बच्चन यांनी घेतली. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दमध्ये त्यांनी अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली. विशेष म्हणजे राजकारणातही धर्मेंद्र हे सक्रिय होते. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी अजूनही निधनाची कोणतीही अपडेट दिली नाहीये. संपूर्ण कुटुंब यादरम्यान दु:खात आहे.
हेच नाही तर धर्मेद्र यांच्या चाहत्यांनी देखील स्मशानभूमीकडे धाव घेतल्याची माहिती मिळतंय. अभिनेत्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहत्यांकडून सातत्याने प्रार्थना केल्या जात होत्या. अभिनेत्याला वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केली जात होती. हेमा मालिनी यांनी देखील अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती आणि आता सर्वकाही देवाच्या हातात असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती होती.
