मराठा आरक्षणासाठी किती बळी घेणार?  मेटेंचा अपघात की घातपात? : आबासाहेब पाटील

मराठा आरक्षणासाठी किती बळी घेणार? मेटेंचा अपघात की घातपात? : आबासाहेब पाटील

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar

राजकीय वर्तुळातून मेटेंच्या निधनानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली होती, त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते. मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? घटनेमागचं सत्य समोर यावं. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यासोबतच ते म्हणाले की, हा एक लढवय्या नेता होता, ज्यानी मराठा समाजासाठी सभागृहात आवाज उठवला. समाजाच्या आरक्षणाबाबत प्रचंड अभ्यास केला. समाजाचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले. मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालंय. आमची विनंती आहे. की मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि याचा लवकरात लवकर निकाल लावावा. आणि मराठा आरक्षण देऊन मेटे यांचं स्वप्न पूर्ण करावं. हीच खऱ्या अर्थाने मेटेंना भावपूर्ण श्रद्धांजली असेल.

मराठा आरक्षणासाठी किती बळी घेणार?  मेटेंचा अपघात की घातपात? : आबासाहेब पाटील
मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; विनायक मेटे यांची क्रांतिकारी कारकीर्द
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com