Manoj Jarange Mumbai Morcha : आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचे हाल; झोपण्याला जागा तर पाण्याला पाणी....
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये गणपती मंडपांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावली असली, तरी सणाचा उत्साह काहीसा कमी झालेला नाही. काही भागांत मुसळधार पावसामुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिकच आव्हानात्मक बनले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवी वातावरणच मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. यांच्यासोबत अनेक मराठा बांधव या उपोषणात सामील झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित संख्येने सहभागींसह आंदोलन करण्याची अटींसह परवानगी दिली आहे, जेणेकरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
काल दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे आझाद मैदानावर चिखल निर्माण झाले. त्यानंतर रात्रभर आझाद मैदानाजवळील शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मराठा आंदोलकांनी रात्रीचा आसरा घेतला. त्यांनतर पुन्हा ते आझाद मैदानावर येऊन ठेपलं. जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. मराठा बांधवांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. येथील शौचालयांमध्ये काल रात्रीपासून पाणी नाही. आम्हाला पालिकेने पिण्याचे पाणी आणि साधा तंबूही उपलब्ध करुन दिला नाही.
शौचालयात पाणी उपलब्ध नसल्याने एका मराठा बांधवाने ट्रकभरुन बिसलरीच्या बाटल्या आणल्या. या बाटल्या घेऊन मराठा बांधव शौचालयात गेले, असे एका मराठा आंदोलकाने सांगितले. आझाद मैदानात सगळीकडे पाणी तुंबलंय, आम्ही समुद्रात राहतोय, असे वाटते. आम्ही रात्रभर जागरण केले. एकही मराठा बांधव रात्रभर झोपला नाही. पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले, असेही या मराठा आंदोलकाने सांगितले. त्यामुळे आज राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका मराठा आंदोलकांची काही सोय करणार का, याकडे सर्वांच्या लक्ष द्यावे अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे.