Kabutarkhana Andolan : 'जैन समाजावर का कारवाई केली नाही?' मराठी एकीकरण समितीचा पोलिसांना सवाल

Kabutarkhana Andolan : 'जैन समाजावर का कारवाई केली नाही?' मराठी एकीकरण समितीचा पोलिसांना सवाल

आज दादरमध्ये कबुतरखान्याच्या बंधीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आंदोलन सुरु केले आहे, याचपार्श्वभूमिवर पोलिसांकडून या आंदोलकांना धक्काबुक्की केली यावेळी आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

दादर कबुतरखाना बंदीच्या आदेशानंतर निर्माण झालेला वाद अधिक चिघळला आहे. मंगळवारी सकाळी मराठी एकीकरण समितीने या निर्णयाच्या विरोधात कबुतरखान्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती, तसेच आयोजकांना आंदोलनाच्या आधीच नोटीस बजावण्यात आली होती. तरीदेखील कार्यकर्ते ठिकाणी जमले, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनस्थळी पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांशी वाद निर्माण झाला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान मराठी एकीकरण समितीचे नेते गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. “माझ्या हाताला पोलिसांच्या धक्काबुक्कीत दुखापत झाली. ही उघड दडपशाही आहे. जैन समाजावर कारवाई का केली जात नाही?” असा सवाल देशमुख यांनी केला.

कबुतरखाना बंदीच्या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही संघटनांनी या ठिकाणी धार्मिक भावना जोडल्या गेल्याचे सांगत बंदीविरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कारणास्तव ही बंदी योग्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

घटनेनंतर दादर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि दुकानदारांमध्ये अस्वस्थता असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात तोडगा निघेपर्यंत तणाव कायम राहण्याची चिन्हे आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com