Shashank Ketkar Post : "आम्हाला मरायचं नाहीये";
Shashank Ketkar Post : "आम्हाला मरायचं नाहीये"; शशांक केतकरचा सरकारवर रस्ता सुरक्षा आणि दुर्लक्षिततेवर संतापShashank Ketkar Post : "आम्हाला मरायचं नाहीये"; शशांक केतकरचा सरकारवर रस्ता सुरक्षा आणि दुर्लक्षिततेवर संताप

Shashank Ketkar Post : "आम्हाला मरायचं नाहीये"; शशांक केतकरचा सरकारवर रस्ता सुरक्षा आणि दुर्लक्षिततेवर संताप

शशांक केतकरचा संताप: रस्ता सुरक्षा आणि सरकारी निष्काळजीपणावर तीव्र टीका
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shashank Ketkar Instgram Post: झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' मालिकेच्या माध्यमातून 'श्री' म्हणजेच शंशाक केतकर हा घराघरांत जाऊन पोहचला. मालिकेमध्ये सात महिलांना सांभाळणारा असा हा श्री म्हणजेच शशांक केतकर तरूणींच्या गळ्यातील ताईत झाला होता. शंशाकने अनेक भूमिका साकारल्या. सध्या तो मुरंबा मालिकेत काम करत आहे. काहीवेळापुर्वी इन्स्टाग्रामवर एक तीव्र व्हिडीओ शेअर केला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवरील सरकारी निष्काळजीपणावर टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, मढ आयलंड भागातील रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या धोकादायक झाडाकडे केतकरांनी लक्ष वेधले आहे.

या व्हिडीओमध्ये आणि त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये शशांकनी बंद स्ट्रीट लाइट्स, खराब रस्ते आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केलाआहे. "देशात विकास होत आहे. याचा आनंद आणि अभिमान आहे. पण अशा लाखो दुर्लक्षित छोट्या गोष्टी आहेत. हे भ्रष्टाचार नाही हा फक्त कंटाळा, निष्काळजीपणा आणि ‘चालतंय’ वृत्तीचा परिणाम आहे," असं त्यांनी लिहिलं.

व्हिडीओमध्ये शशांक काय म्हणाले?

"पावसाळा सुरू होतोय. लाईट्स बंद असतील, जोरदार पाऊस पडत असेल आणि जर रस्त्याच्या मधोमध उभं असलेलं झाडच दिसलं नाही तर?" असा प्रश्न शशांक यांनी उपस्थित केला. "कदाचित अनेकांना माझं बोलणं विनोदी वाटेल, पण प्रत्येकाच्या मनात हे खरं असल्याची जाणीव असते. ही परिस्थिती केवळ मुंबईत नाही, तर महाराष्ट्रभर आणि देशभर सर्वत्र दिसते," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

त्या रस्त्याचं काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालं असूनही त्याच्या मध्यभागी दोन झाडं का सोडण्यात आली, याबाबत केतकरांनी प्रश्न उपस्थित केला. "जपानमध्ये झाडं मुळासकट हलवून दुसरीकडे लावतात. मी एवढी अपेक्षा करत नाही. पण रस्ता करताना ही दोन झाडं का ठेवली गेली? ही सौंदर्यवृद्धीसाठी आहेत की दुभाजक म्हणून? मला अजूनही उत्तर सापडलेलं नाही," असं त्यांनी सांगितलं. केतकरांच्या या व्हिडीओला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक कलाकारांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी सरकारकडे तात्काळ पावलं उचलण्याची मागणी केली आहे.

"आम्हाला मरायचं नाहीये": शशांक केतकर यांचा सरकारवर सडक सुरक्षा आणि दुर्लक्षिततेवर संताप
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com