'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके', आज मराठी भाषा गौरव दिन
आज मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला जातो. कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषा जगभरात पोहोचवण्याचे काम आजवर अनेक मराठी साहित्यिकांनी केले आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
मराठी भाषा दिन हा थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. सांस्कृतिक कार्यक्रम, कविता वाचन आणि चर्चासत्रांसह विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटनेतील कलम 347 नुसार कोणत्याही भाषेला राजभाषा मान्यता देण्याची तरतुद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा विस्तारली आहे. नुकतेच दिल्लीमध्ये '98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' संपन्न झाले. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती बघायला मिळाली. त्यांनीदेखील मराठी भाषेचे अनेक गोडवे गायले.