Marathi Vs Gujrati : 'मराठी माणसं घाणेरडी...' घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद

मराठी-गुजराती संघर्ष: घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबांना खालच्या दर्जाची वागणूक
Published by :
Prachi Nate

घाटकोपर मध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटला आबे. घाटकोपर मधील एका सोसायटीमध्ये फक्त चार मराठी सहिवाशांची घरे आहेत. संपुर्ण इमारत ही गुजरती रहिवाशांची आहे, व येथील गुजराती रहिवाशी हे मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे.

"मराठी माणसे घाणेरडी आहेत... मच्छी खातात.." असं म्हणत तिथे राहणाऱ्या मराठी कुटुंबांना खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. यावरून मराठी गुजराती वाद पेटला असून मराठी गुजराती कुटुंब आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता यावर राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com