घाटकोपर मध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी; उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटांन तोडला

घाटकोपर मध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी; उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटांन तोडला

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकलं आहे.
Published by :
Team Lokshahi

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं. या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर त्यावरुन मोठा वाहदी सोशल मीडियावर सुरू होता. तो फोटो होता घाटकोपर पूर्व येथे लावण्यात आलेला 'मारु घाटकोपर' बोर्ड. घाटकोपर पूर्व येथील एका उद्यानात हा बोर्ड लावण्यात आलेला. हा बोर्ड तात्काळ हटवावा अशी मागणी सातत्यानं मनसेच्या वतीनं महापालिकेकडे केली जात होती. तसेच, महापालिकेला अल्टिमेटमही मनसेच्या वतीनं देण्यात आला होता. मात्र, मध्यरात्री अचानक काही लोकांकडून या बोर्डाची तोडफोड करण्यात आली. 

घाटकोपरमधील तोडफोड करण्यात आलेल्या बोर्डाजवळ एक फलक लावण्यात आला आहे. हा फलक शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचा असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर घाटकोपरमधील 'मारू घाटकोपर' या बोर्डाचा आधीचा फोटो आणि तोडफोड केल्यानंतरचा फोटोही एकत्र करुन शेअर करण्यात येत आहे. तसेच, त्या फोटोवर मुंबईचा मराणीबाणा पुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला, असा मजकूरही लिहिण्यात आला आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' बोर्डाच्या तोडफोडीनंतर आता मराठी गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com