Narendra Chapalgaonkar
Narendra ChapalgaonkarTeam Lokshahi

मराठी साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार; पोलिसांनी चक्क संमेलनाध्यक्षांच अडवलं

या सर्व प्रकारावर नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.
Published by :
Sagar Pradhan
Published on

वर्ध्यात सध्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. याच संमेलनात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनाच संमेलनात येण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा प्रकार समोर आला आहे.

मात्र, यावेळी चपळगावकर यांचे पोलिसांनी वाहन रोखताच नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी आम्ही मारेकरी दिसतो का?, अशा शब्दांत पोलिसांना सुनावले. त्यानंतर पोलिसांनी संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या वाहनाला आत जाण्यास परवानगी दिली.

Narendra Chapalgaonkar
मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांची टीका; म्हणाले, बऱ्याच जणांनी नवीन सूट...

नेमकं काय घडलं त्या ठिकाणी?

96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. त्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप शुभारंभ कार्यक्रम होत असतानाच संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे त्या ठिकाणी येत होते. मात्र, प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. हा बातमी आता सर्वत्र चर्चेत येत आहे.

या सर्व प्रकारावर नरेंद्र चपळगावकर यांची मुलगी भक्ती चपळगावकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, गेली दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या पंच्याऐंशी वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या ८८ वर्षांच्या मित्राला डी सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेंव्हा ९०० पोलिस होते, आज उंपमुख्यमंत्री येणार म्हणून आहेत. मी प्रत्येकवेळी पोलिसांना समजाऊन, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. आज धीर संपला आणि पोसिसांना ओरडले, चालणार नाहीत ते. चालू हकणार नाहीत एवढं. बिचारे पोलिस ते आदेशाचे पालन करत होते. बावचळले आणि जा म्हणाले. गंमत आहे सगळी & बाबांना काहीही फरक पडला नाही. गाडी बुक स्टे लकडे वळली, ते त्यांच्या विश्वात रमले आहेत. अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.

नरेंद्र चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांची फेसबुक पोस्ट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com