Marathi youth in Mumbai: मराठी माणसाची गळचेपी थांबणार कधी? महाराष्ट्रात मराठी तरुणाला नोकरी नाकारली
महाराष्ट्रात सध्या मराठी माणसासोबत कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून गळचेपी केली जात आहे, मग ती भाषेवरून असो किंवा एखाद्या हायक्लास सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाची असो. नुकत्याच काही घटना समोर आल्या ज्यामध्ये कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता.
त्यानंतर मुंब्रामध्ये एका मराठी भाषेत बोलणाऱ्या तरुणाला माफी मागायला लावली होती. असं सगळ होत असताना आता दक्षिण मुंबईतील एका तरुणाला तो मराठी असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतो. महाराष्ट्रातच होणारी मराठी माणसाची गळचेपी थांबायचं नाव घेत नाही.
नेमकं काय घडलं ?
मराठी पोर आम्हाला कामाला नको, मराठी पोर आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत असं मरिन लाईन्स येथील राधेश्याम कंपनीकडून सांगण्यात येत तरुणाला नोकरी नाकारण्यात आली. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि दोन दिवसांत सोडून जातात म्हणून आम्हाला मराठी मुलं कामाला नको, असं कंपनीच्या मालकानं म्हटलं आहे. त्यानंतर त्या युवकाने लगेच घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसेना दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे संपर्क साधला.
तात्काळ दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे व कुलाब विभाग अधिकारी विकास अडुळकर यांनी त्या संबंधित कंपनीच्या ऑफिसला भेट देत तेथील कंपनीच्या मालकाला या घटनेबाबत जाब विचारण्यात आला तसेच मराठी मुलांना महाराष्ट्रात राहून जर नोकऱ्या देणार नसतील तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली व यापुढे मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देऊ असे आश्वासन दिल्यावर त्यांना समज देऊन सोडण्यात आले..