मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात; भाजपा परिवर्तन घडवून आणणार?
Admin

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात; भाजपा परिवर्तन घडवून आणणार?

आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा निकाल जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचवेळी मतमोजणी केंद्रावर आलेले राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि किरण पाटील दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजप उमेदवार किरण पाटील दोन्ही दाखल झाले आहेत.

या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. विभागात 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता निकाल कुणाच्या बाजून लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com