Market Committee Election :  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Admin

Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान आहे. आज राज्यातील 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.

आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट निवडणूक लढवत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com