Dowry Case In Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील महिलेनं घेतला गळफास; गुन्हा दाखल
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठीच्या त्रासासाठी जीव केल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमधून देखील हुंडाबळीची एक घटना समोर येत आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरामध्ये 37 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वस्ती राहणाऱ्या अथर्व योगेश गुजराती (वय 40) यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती (वय 37) यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. भक्तीचे वडिल दिलीप प्रभाकर माडीवाले यांनी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधिकची चौकशी करत आहेत. सासऱ्या मंडळींचा जाबजबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. या प्रकरणाची भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दखल घेतली असून त्यामुळे पोलीस देखील अॅक्शन मोडवर येऊन या घटनेचा तपास करत आहेत.