Raigad Fire: रायगडच्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये भीषण आग; 2 कामगार जखमी

Raigad Fire: रायगडच्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये भीषण आग; 2 कामगार जखमी

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगडच्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. सोनी केमिकल कंपनीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये दोन कामगार जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

कराडे खुर्द येथील थिनरचे उत्पादन करणाऱ्या सोनी केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अंदाजे दहा बारा कामगारांची कंपनी आहे. आग दुपारच्या सुमारास लागली. आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समोर येऊ शकले नाही. रसायनी पाताळग़गा व आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाचे नौजवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोनी केमिकल कंपनीत थिनरच्या रॉ मटेरिअल वर प्रक्रीया करुन थिनर बनविले जाते. आग विझवण्यासाठी खोपोली नगरपरिषद पनवेल महानगरपालिका तसेच विविध कंपन्यांच्या फायरच्या गाड्या दाखल झालेले आहेत, साधारणपणे पाच गाड्या अग्नीस्थळी रवाना झालेले आहेत.

तसेच या कंपनीच्या गोदामात कोणी कामगार अडकलेले आहे की नाही याचाही शोध घेण्यात येत आहे. आग इतकी भीषण आहे की, आगीच्या ज्वाळा दूरवरुनच दिसत आहेत. तसेच धुराचे लोटही त्या परिसरात दिसून येत आहेत. एमआयडीसीतील कंपनीत आग लागल्याच्या घटना या सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा कायम असल्याचं दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com