ताज्या बातम्या
Gujarat Cracker Factory Fire : बनासकांठा येथे फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 18 कामगारांचा मृत्यू
गुजरात फटाका स्फोट: बनासकांठा फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग, 18 कामगारांचा मृत्यू.
गुजरातमधील बनासकांठा येथील डीसा येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोट होताच गोदामाच्या अनेक भिंती कोसळल्या आणि त्यात आग लागली. कारखान्यात कामगार फटाके बनवत असताना, एक मोठा स्फोट झाला आणि कामगारांचे मृतदेह दूरवर पडले.
खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डीसा येथील धुनवा रोडवर दीपक ट्रेडर्स नावाचा फटाक्यांचा कारखाना आहे. आज फटाके बनवत असताना अचानक स्फोटक पदार्थाचा स्फोट झाला, ज्यामुळे आग लागली.