Navi Mumbai
ताज्या बातम्या
Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग
नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली.
(Navi Mumbai ) नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. APMC मार्केटजवळील ट्रक पार्किंगमधील गोडाऊनला आग लागली आहे. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 20 येथील एपीएमसी मार्केटजवळील ट्रक पार्किंग लॉटमधील एका गोडाउनमध्ये रात्री आग लागली. या गोडाउनमध्ये प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवल्या होत्या. आगीच्या ज्वाळा दूरवर पसरल्या.
या आगीच्या घटनेत 15 ते 20 ट्रक जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.