मुंबईच्या कुर्ला भागात इमारतील भीषण आग; बचावकार्य सुरु

मुंबईच्या कुर्ला भागात इमारतील भीषण आग; बचावकार्य सुरु

मुंबईतल्या कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Published by  :
shweta walge

मुंबईतल्या कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कुर्ल्यातील नवीन टिळक नगर रेल व्ह्यू इमारतीत ही मोठी इमारत आहे. ही आग सध्या इमारतींच्या काही मजल्यांपर्यंत पोहोचली आहे. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com