Gujarat Fire : केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव; संपूर्ण मालमत्ता जळून खाक

Gujarat Fire : केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव; संपूर्ण मालमत्ता जळून खाक

गुजरात राज्यातील वडोदऱ्यामध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

गुजरात राज्यात असलेल्या वडोदरा येथील एका केमिकल कंपनीला शनिवारी भीषण आग लागली. या घटनेनंतर आग वीजविण्यासाठी तात्काळ अग्निशनमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अचानक वडोदरा येथे असलेल्या एका केमिकल कंपनीमध्ये आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की आकाशामध्ये सर्वत्र या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ दिसू लागले. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. परंतु, अद्यापही या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com