Pune Mundhwa land Case
Pune Mundhwa land CasePune Mundhwa land Case

Pune Mundhwa land Case : पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातील शीतल तेजवानीला पोलिसांनी अटक

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी याला अटक करण्यात आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Pune Mundhwa land Case) पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ती मुख्य सूत्रधार असून, पुणे पोलिसांनी तिला बेकायदेशीर जमीन विक्री आणि जबरदस्तीने जमिनीवर हक्क मिळवण्याच्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. आता तिचे गैरकायदेशीर उपक्रम हळूहळू समोर येत आहेत.

शीतल तेजवानीच्या अटकेमागील कारणे देखील उघड झाली आहेत. शासनाच्या परवानगीशिवाय तिने जमिनीच्या मूळ मालकांकडून व वारसांकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केली. या फसवणुकीमुळे पोलिसांनी तिला अटक केली. ती शासनाची जमीन स्वतःच्या फायद्यासाठी थेट विक्रीत गुंतलेली होती.

पोलिस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, तेजवानीने जमिनीचे व्यवहार करताना ७/१२ हद्द बंद असतानाही ती जमीन व्यवहारात समाविष्ट केली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी चौकशी दरम्यान तेजवानीकडून स्पष्ट माहिती मागितली होती.

शीतल तेजवानी कोण आहे?
शीतल तेजवानी पिंपरीची रहिवासी असून, तिच्या नवरा सागर सूर्यवंशी यांच्याविरोधातही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस हद्दीत तिच्यावर सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तसेच, सीआयडी आणि ईडीनेही तिच्यावर कारवाई केली आहे. सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात ती अटकेला आली होती. याशिवाय शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध दोन गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com