ताज्या बातम्या
Matheran : आजपासून माथेरान बेमुदत बंद; कारण काय?
आजपासून माथेरानमध्ये बेमुदत बंद पाळण्यात येणार आहे.
आजपासून माथेरानमध्ये बेमुदत बंद पाळण्यात येणार आहे. माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची फसवणुक होत आहे. या फसवणुकी विरोधात माथेरानकर एकवटले आहेत. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
माथेरानला रोज हजारो पर्यटक येत असतात. पर्यटकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणुकीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले आहे. हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, सामाजिक संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा बंद सुरू राहणार असल्याची माहिती मिळत असून पर्यटकांमुळे गजबजलेल्या माथेरानमध्ये शुकशुकाट पाहायला मिळणार आहे.