Mayor reservation draw date : महापौरपद कुणाचं? आरक्षण सोडतीची तारीख अखेर समोर, जाणून घ्या तारीख
Mayor reservation draw date announced : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून बहुतांश ठिकाणी सत्तेचं चित्र स्पष्ट झालं आहे. तब्बल 25 पालिकांमध्ये महायुतीकडून महापौर निवडला जाणार असल्याचं जवळपास ठरलं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास विभागाने अखेर तारीख जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेश दौऱ्यावर असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनंतर ही प्रक्रिया पुढे सरकली आहे. 22 जानेवारी रोजी मंत्रालयात आरक्षण सोडत पार पडणार आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. आकड्यांचा ताळमेळ बसवण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, नगरसेवकांची फोडाफोडीही रंगताना दिसत आहे. मुंबईत महायुतीचा महापौर निश्चित मानला जात असला, तरी अडीच वर्षांचा फॉर्म्युला आणि नेतृत्वावरून अजूनही चर्चा सुरू आहेत. अंतिम निर्णय काय होणार, याची उत्सुकता कायम आहे.
थोडक्यात
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.
बहुतांश ठिकाणी सत्तेचं चित्र आता स्पष्ट झालं आहे.
तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये महायुतीकडून महापौर निवडला जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

