Test Cricket : "रोहित शिव्या द्यायचा..."; कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या वक्तव्याने सर्वजण चकित
Test Cricket : "रोहित शिव्या द्यायचा..."; कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या वक्तव्याने सर्वजण चकित Test Cricket : "रोहित शिव्या द्यायचा..."; कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या वक्तव्याने सर्वजण चकित

Test Cricket : "रोहित शिव्या द्यायचा..."; कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या वक्तव्याने सर्वजण चकित

शुभमन गिलचे वक्तव्य: रोहित शर्माची रणनीती आणि विराट कोहलीचे विचार टीम इंडियाच्या यशासाठी महत्त्वाचे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

सध्या इंडियाची टीम इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडिया Team India महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. दरम्यान शुभमन गिलची मुलाखत घेतली असता त्याने रोहित शर्मा Rohit Sharma आणि विराट कोहली Virat Kohali यांच्याबाबतीत महत्वाचे विधान केलेले आहे . यंदा बीसीसीआय BCCI ने शुभमन गिलची कसोटी क्रिकेट Test cricketचा नवा कर्णधार New captain म्हणून निवड केली. रोहित शर्मा Rohit Sharma आणि विराट कोहली ह Virat Kohli कर्णधारपदावर असताना त्यांच्याकडून शुभमन गिलला जे शिकायला मिळाले, त्याबाबत शुभमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

इंग्लंड दौऱ्या England tours वरती यावेळी आपल्याला ही मालिका जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मागच्या सतरा वर्षापासून भारताला ही मालिका जिंकता आलेली नाही. 2007 मध्ये राहुल द्रविड कॅप्टन असताना भारताने ही मालिका जिंकली होती. त्यानंतर आजतागायत भारताला ही मालिका जिंकता आलेली नाही. त्यातच आपल्या टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी कसोटी सामन्यामधून निवृत्ती घेतल्यामुळे टीम इंडियाला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. रोहित शर्माबाबत बोलताना शुभमन गिल Shubman Gill म्हणाला की " रोहित शर्माची क्रिकेट विश्वातली रणनीती ही खुप भन्नाट आहे. ते खेळाडूंची थेट चर्चा करायचे आणि त्यामुळे अत्यंत योग्य पद्धतीने टीम इंडिया खेळायची, तो खेळाडूंना शिवीगाळ करत असला तरीही कोणाला राग यायचा नाही. त्याचे व्यक्तिमत्व तसे आहे असे त्याचे म्हणणे आहे. कधी कधी तो कठोर होतो मात्र ते टीम इंडियाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे आहे."

त्याचबरोबर विराट कोहलीबद्दलही त्यांनी सांगितले की, "विराट कोहली बरोबर तो जेव्हा खेळत होता तेव्हा त्याचे क्रिकेट बाबतचे विचार त्याच्या मनाला खूप भावले एखादी रणनीती यशस्वी झाली नाही तर विराट कोहली हताश न होता लगेच दुसऱ्या क्षणाला आपल्याला यामध्ये काय बदल करता येतील" हे गोलंदाजांना समजावून सांगायचे मात्र आता हे दोन्ही दिग्गज कसोटी सामन्यांमध्ये नसल्यामुळे आता शुभमन गिलला जास्त मेहनत घेऊन आपल्या टीम इंडियाला 17 वर्षानंतर पुन्हा एकदा विजेते प्राप्त करून द्यायचे आहे यासाठी टीम इंडिया Team India मला खूप प्रयत्न करावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com