Maharashtra-Karnataka Border IssueTeam Lokshahi
ताज्या बातम्या
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर होणार बैठक; तोडगा निघणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसंदर्भात सुचना दिल्या आहेत.
सतेज औंधकर, कोल्हापूर
महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसंदर्भात सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमध्ये सीमा प्रश्नाबाबत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीची सूचना केली आहे. 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये दोन्ही राज्यांची व्यापक बैठक होणार आहे. बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल राहणार उपस्थित राहणार आहेत. सीमाप्रश्नासह अलमट्टी धरण, हत्तींच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.