ताज्या बातम्या
Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, सर्व फेऱ्या 20 मिनिटं विलंबाने
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान 20 मिनिटं विलंबाने फेऱ्या, सीएसटी ते वाशी विशेष लोकल सेवा
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. उद्या मेगाब्लॉकमुळे सर्व रेल्वे फेऱ्या 20 मिनिटं विलंबाने होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान ब्लॉक असेल तर हार्बर रेल्वेवर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान ब्लॉक असेल.
तसेच या दरम्यान सीएसटी ते पनवेल आणि बेलापूर त्याचसोबत पनवेल ते ठाणे दरम्यान अप-डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार असून सीएसटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. त्याचसोबत पश्चिम मार्गावरील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे, या मार्गावरील रविवार असून देखील सर्व मेगा ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत.