Mega Block
Mega BlockTeam Lokshahi

उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक कसे असेल जाणून घ्या

उद्या रविवारी, ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on

उद्या रविवारी, ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते जोगेश्वरीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

तसेच मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवून त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावणार आहे.

गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील. पनवेलकरीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com